राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयात सुरू असलेल्या जनता दरबारात उपस्थितीत लावली. युगेंद्र पवार आधीच जनता दरबारात हजर होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर बसून स्वतः शरद पवार यांनी ही सामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या. दरम्यान, युगेंद्र पवार हे आगामी विधानसभेची तयारी करत असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.