राज्यभरात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्या पार्श्वभूमीवर काल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर काम करण्याची संधी द्यावी आणि मंत्रिपद देखील देण्यात यावं, अशा स्वरूपाचा ठराव करण्यात आला आहे. याबद्दलची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली आहे.