तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू हे आज (१२ जून) चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थिती हा शपथविधी सोहळा पार पडत आहे. दरम्यान, ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएच्या एकूण ७१ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.