मणिपूरमधील परिस्थितीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सराकरला लक्ष्य केलं. त्यावरून आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना टोला लगावला आहे. मोहन भागवत यांचं म्हणणं पंतप्रधान गांभीर्याने घेणार का? असा प्रतिप्रश्नही उद्धव ठाकरेंनी केला.