लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर अवघ्या ४८ मतांनी हरले. सुरुवातीला त्यांनाच विजयी करण्यात आलं होतं. परंतु, फेर मतमोजणी झाल्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं. यावरून ठाकरे गटाने चौकशीची मागणी केली असून याप्रकरणी ते न्यायालयातही जाणार आहेत. याबाबत खासदार संजय राऊतांनी रिटर्निंग अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.