राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अन्य नेतेही राज्यसभेसाठी उत्सुक होते. मात्र लोकसभेत पराभव झाल्यानंतरही सुनेत्रा पवारांना लगेच राज्यसभेची संधी देण्यात आली. त्यामुळे अजित पवार गटात नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. आज (१३ जून) सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी छगन भुजबळही उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपणही राज्यसभेसाठी इच्छुक होतो, मात्र एकमताने सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाल्याचं त्यांनी सांगितलं.