रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ अशा आशयाचे ट्वीट ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं होतं. त्यामुळे अंधारे यांनी एकप्रकारे पक्षात येण्याची ऑफरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांना दिल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर आता रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.