राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र उमेदवारी घोषित करण्यासाठी झालेला विलंब पाहता भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता राज्यसभेसाठीही त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र लोकसभेत पराभव होऊनही सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही वेळेला भुजबळांवर अन्याय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर भुजबळांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.