नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात खाद्यतेलासह लसणाच्या किंमतीत वाढ झाली आहे. प्रत्येक प्रकारच्या खाद्य तेलाच्या दरात २५ ते ७५ रुपयांची दरवाढ झाली आहे. तर पावसाचा मोठा परिणाम लसूण उत्पादनावर झाल्याने आवकही मंदावली आहे. त्यामुळे खाद्यतेल आणि लसणाच्या वाढलेल्या किंतीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.