सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. शिवाय उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना आणि भाजपामधील कोणत्याही नेत्यांची उपस्थिती नव्हती यावरही अजित पवारांनी खुलासा केला आहे.