राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्याच्या निमित्ताने शुक्रवारी (१४ जून) पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील पराभवावर भाष्य केलं. तसंच राज्यसभेनंतर मंत्रिपद मिळण्याबाबतही चर्चा आहे. त्यावरही सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.