लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फटका बसला. महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष म्हणून येणाऱ्या भाजपासाठीही हा मोठा फटकाच होता. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या त्यापैकीच एक म्हणजे मराठा आरक्षणचा विषय. याबाबत भाजपाच्या नेत्यांमध्ये विचारमंथन झालं. त्यानुसार मराठा समाजामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल असंतोष असल्याचं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना मान्य केलं.