सांगली लोकसभेतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला. यानिमित्ताने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम देखील उपस्थित होते. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून धुसफूस पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे.