लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात रोड शो तसंच अनेत सभा घेतल्या होत्या. मोदींनी सभा घेतलेल्या अशा जवळपास १८ ठिकाणी मविआच्या उमेदवारांचा विजय झाला. हे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींचे आभार मानत त्यांना एकप्रकारे खोचक टोला लगावला.