मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उपोषण जरी मागे घेतलं तरी जरांगें आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत, संदिपान भूमरे संजय शिरसाट यांनी आज मनोज जरांगेंची रुग्णालयात भेट घेतली.