भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेते पदी निवड झालेली नाही, असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली आहे, पण भाजपाच्या बैठकीत अद्याप झालेली नाही. जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेते पदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता, असेही ते म्हणाले.