पिंपरी- चिंचवडमध्ये चिंचवड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि त्यांचे दिर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पाठोपाठ तीन वेळेस नगरसेवक राहिलेले चंद्रकांत नखाते यांनी देखील चिंचवड विधानसभेवर दावा करत घराणेशाहीला विरोध केला आहे.