नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी विभागात असलेल्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहायला गेलेल्या पाच मित्रांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोहत असताना मस्तीमध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा पाय पाण्यामध्ये खेचला आणि त्यामुळे एका १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तुर्भे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत चारही मित्रांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केला.