भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्याने आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांनी आत्महत्या केली होती. याच आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी (१६ जून) भेट घेतली. यादरम्यान वायभासे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले. या दरम्यान, आणखी एका मुंडे समर्थकाने आत्महत्या केली. यावेळी पंकजा मुंडे स्वतः अंत्यविधीला उपस्थिती लावली. हरिभाऊ बडे असं या मुंडे समर्थकाचे नाव असून ते शिरूर तालुक्यातील वारणी येथील रहिवासी होते.