मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील निकालावरून खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांच्यावर आरोप केले आहे. ईव्हीएम हॅकिंगबाबत सुर्यवंशीबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र त्यानंतरही संजय राऊत आपल्या आरोपांवर ठाम आहेत. यावेळी त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.