उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची आज पत्रकार परिषद पार पडत आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएम हॅकिंगबाबतचे अनेक दावे खोडून काढले होते. त्यावर आदित्य ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.