राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर टिकी टिप्पणी केली जात आहेत. असं असलं तरी पवार कुटुंब एकच असल्याचं बोललं जातं. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी कुटुंबाबत केलेल्या एका विधानावरून नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.