शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. मात्र, यानंतर ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. ही जागा आम्ही जिंकलो असून या प्रकरणी न्यायालयात लढाई सुरू होणार असं ते म्हणाले.