राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेला सुरवात होताच राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बघायला मिळतय, नव्या मंत्री मंडळ विस्तारात अजित पवार यांच्या पक्षाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री दिले जातील अशी चर्चा आहे. त्यानुसार अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि त्यांच्या पिंपरी चिंचवड या बालेकील्यातील आमदार अण्णा बनसोडे यांची वर्णी लागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळें अण्णा बनसोडे हे आज तातडीने मुंबई कडे रवाना झाले आहेत.