अंतरवाली येथे उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची सोमवारी (१७ जून) कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. तसंच त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. हाके यांची तब्येत खालावत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, हे आम्हाला पहिलं सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. तर धनंजय मुंडे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत हाके यांच्याशी चर्चा केली. दरम्यान उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या सरकारपर्यंत मांडणार, असं आश्वस्तही केलं.