मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे. असं असतानाच नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांनी आज (१८ जून) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. राज ठाकरेंच्या भेटीनंतर वायकर यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसंच मतदारसंघातील निकालावरही त्यांनी भाष्य केलं आहे.