मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालावरून सध्या पेच सुरू आहे. ठाकरे गटाने आपली बाजू लावून धरत न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली. आता संजय राऊत यांनी सगळा खेळ समोर येणार असं म्हणत सूचक विधान केलं आहे. तसंच रविंद्र वायकर हे लोकसभेत पोहोचणार नाहीत, असंही ते म्हणाले.