सगे सोयरे अधिसूचना रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मागील पाच दिवसापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ओबीसी समाजाचे नेते अँड मंगेश ससाणे उपोषणाला बसले आहेत. यावेळी ससाणेंनी सगे-सोयरे अधिसूचनेवरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. ओबीसींच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, असाही इशारा त्यांनी दिला आहे.