पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. लोकसभेतील विजयानंतर पंतप्रधान मोदी आज प्रथमच (१८जून) वाराणसी दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा १७वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वात प्रथम शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. त्यामुळे आजच्या शेतकरी संमेलनात ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.