पुढील तीन-चार दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या तीन चार दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. मात्र मान्सून पूर्णपणे राज्यात सर्व दूर दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करावी असं हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितलं आहे.