उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सरकारमधून मुक्त करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे फडणवीसांनंतर राज्यातील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद कोणालं दिलं जाणार अशी देखील चर्चा रंगली आहे. अशातच मंगळवारी (१८ जून) दिल्लीत भाजपाची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत या संदर्भात काय चर्चा झाली याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे.