राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार हे आज बारामतीतील सांगवी दौऱ्यावर होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला. बारामतीतील लोकसभा निवडणुकीची चर्चा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही झाली. हे सांगताना रशियावरून आलेल्या एका तरुणाची त्यांनी यावेळी ओळख करून दिली.