मागील वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या माध्यमांमधून संघर्ष उभारला. तसंच आता मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून दोन्ही समाजातील नेतेमंडळींमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन हे पुणे दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी आरक्षणाबाबत भूमिका मांडली आहे.