शिवसेनेच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उध्दव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत पराभव झालेल्या त्या जागांवर भाष्य केलं. तर या पराभवाचा वचपा आपण काढणार आणि विजय मिळवणार अशी शपथही त्यांनी यावेळी घेतली.