लोकसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेनेला मराठी किंवा हिंदू मतांपेक्षा मुस्लीम मतं जास्त पडल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात यावर भाष्य करत काही मतदारसंघांतील मतांची आकडेवारी सांगितली. तर या आरोपांवर ठाकरेंकडूनही प्रत्युत्त देण्यात आलं आहे.