लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं समोर आलं होतं. त्याचं मोठं कारण होतं जागावाटपासाठी झालेला उशिर आणि उमेदवारांची निवड. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणात शिवसेना नेते रामदास कदम यांनी या मुद्द्यावर बोट ठेवलं. त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंपुढे हात जोडत भाजपाची एकप्रकारे तक्रारच केली.