सगे सोयऱ्यांच आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांनाच प्रतिप्रश्न केला आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी शंभर टक्के टिकणार. मात्र ते टिकू द्यायचं नाही याची तयारी गिरीश महाजन यांनी केली आहे वाटतं, असंही जरांगे म्हणाले.