शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुतीतील प्रवेशावरून विधान केलं होतं. त्यानंतर रायगड लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलतानाही आक्षेपार्ह विधान केलं. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी भूमिका मांडली आहे.