ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करण्याच्या मागणीला विरोध करत हाके यांनी आंदोलन पुकारलं आहे. आज सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. तसंच उपोषण मागे घेण्याचीही विनंती केली.