पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाला चक्क पुरुषाने सात प्रदक्षिणा घातल्या आहेत. आजचा हा सण महिलांसाठी असल्याचं नेहमीच बोललं जातं. याला छेद देत पुरुषांनी देखील वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून स्त्री, पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी हक्क संरक्षण या संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला.