राज्यात सध्या मराठासह ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. आंदोलनांमुळे दोन्ही समाजात संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. एकीकडे मनोज जरांगेंच्या मागण्यांकडे सरकार लक्ष घालत आहे. मात्र ओबीसी आंदोलकांकडे काना डोळा केला जात असल्याची चर्चा आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.