राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष तीव्र होत असताना पंकजा मुंडे यांना पक्षाकडून राज्यसभेची संधी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील धुसफूस समोर आली आहे. त्यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं.