१८व्या लोकसभेचं पहिलं संसद अधिवेशन आजपासून (२४ जून) सुरू होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनाच्या आवारातून प्रसार माध्यमांना संबोधित करत आहेत. २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. ही रालोआ सरकारची पहिली परीक्षा ठरेल. २७ तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होईल. केंद्र सरकारने केलेल्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून अधिवेशनापूर्वीच वाद उफाळून आला आहे. त्यातच लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ आधीच्या दोन कार्यकाळांपेक्षा अधिक झाल्याने सरकारची कसोटी लागणार आहे.