१८व्या लोकसभेचं पहिलं संसद अधिवेनश आजपासून सुरू झालं आहे. पहिल्या सत्रात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिममधील रवींद्र वायकर यांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे संसदेतील वायकर यांच्या शपथविधीचं काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता खासदार संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.