मुस्लीम बांधवांनाही ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यावरून आता पुन्हा मनोज जरांगे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद पेटला आहे. जरांगेंनी आधी अभ्यास करावा, असं भुजबळ म्हणाले आहेत. तर मुस्लीमांना आरक्षण द्यावचं लागेल, अशी भूमिका जरांगेंनी मांडली आहे,