Parliament Session: १८व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन आज (२४ जून) सोमवारपासून सुरू झालं आहे. पहिले दोन दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी, २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. ही रालोआ सरकारची पहिली परीक्षा ठरेल. त्यानंतर २७ तारखेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होईल. केंद्र सरकारने केलेल्या हंगामी अध्यक्षांच्या निवडीवरून अधिवेशनापूर्वीच वाद उफाळून आला आहे. त्यातच लोकसभेत विरोधकांचे संख्याबळ आधीच्या दोन कार्यकाळांपेक्षा अधिक झाल्याने अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे.