मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. त्यामुळे जातील संघर्ष देखील वाढलेला पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रोखठोक भूमिका मांडली आहे. हे पुढारी जाती जातीत द्वेष पसरवून मतं मिळवतील. महाराष्ट्रात असं कधी नव्हतं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.