पिंपरी- चिंचवडमध्ये पिंपरी विधानसभेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पिंपरी विधानसभेवर दावा केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी पिंपरीचा आमदार हा शिवसेनेचाच असणार असा चंग बांधला असून पिंपरी विधानसभेवर दावा केला आहे.