लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा धुसफूस, नाराजीचा सुर उमटू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवड मध्ये नुकतीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात परखड मतं मांडली आहेत.