पुण्यातील एफसी रोडवरील हाॅटेलमध्ये काही तरुण अमली पदार्थांचं सेवन करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील बार, पब्स आणि अमली पदार्थांचा मुद्दा चर्चेत आला आहे. विरोधकांकडून प्रशासन आणि सरकारला जाब विचारत आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.